Ad will apear here
Next
निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात ऐतिहासिक उच्चांक
सेन्सेक्सने पार केला ४० हजारांचा टप्पा

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर, भाजप आघाडीवर असल्याचे कल दिसू लागताच, भारतीय शेअर बाजारानेही उसळी घेतली आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ऐतिहासिक ४० हजारांचा टप्पा पार केला. गुरुवारी, २१ मे रोजी, सकाळी शेअर बाजार सुरू होताच, सुरुवातीच्या १५ मिनिटांतच सेन्सेक्सने तब्बल एक हजार १४ अंकांनी उसळी घेऊन ४० हजार १२४ अंकांचा ऐतिहासिक विक्रम नोंदवला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी या निर्देशांकानेही ३०३ अंकांची झेप घेत ऐतिहासिक १२ हजारांचा टप्पा पार करत १२ हजार ४१ अंकांवर पोहोचला. 


त्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीत चढ-उतार सुरू असून, आतापर्यंत सेन्सेक्स ४० हजारांवरून खाली येत ३९ हजार २८१ अंकांवर, तर निफ्टी ५६ अंकांनी घसरून ११ हजार ७९३ अंकांवर पोहोचला आहे. 

(निवडणूक निकालांचे अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZPECA
Similar Posts
सेन्सेक्स, निफ्टीचा विक्रमी उच्चांक मुंबई : नऊ सत्रांनंतर मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख शेअर निर्देशांकांनी नवीन विक्रमी उच्चांक नोंदवला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने दिवसभरात ३९ हजार ३६४चा टप्पा गाठला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ११ हजार ८१० पर्यंत झेप घेतली. दिवसअखेर सेन्सेक्स ३७० अंकांनी
सेन्सेक्सची विक्रमी उच्चांकाला गवसणी मुंबई : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) दोन एप्रिल २०१९ रोजी इतिहासात प्रथमच ३९ हजारांचा सार्वकालिक उच्चांकी टप्पा पार करून तो टिकवून ठेवण्यात यश मिळवले. याआधी २९ ऑगस्ट २०१८ रोजी सेन्सेक्सने ३८ हजार ९८९पर्यंत झेप घेतली होती. त्यानंतर दोन एप्रिल २०१९ रोजी सेन्सेक्सने ३९ हजारांचा आतापर्यंतचा विक्रमी उच्चांक गाठण्यात यश मिळवले
‘जनसामान्यांना सोबत घेऊन नवा भारत घडविणारे संकल्पपत्र’ मुंबई : ‘भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी, आठ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध केलेले संकल्पपत्र हे शेतकरी, गावकरी, युवा, महिला, गरीब, अनुसूचित जाती- जमाती, व्यापारी, उद्योजक अशा सर्व समाजघटकांना सोबत घेऊन नवा भारत घडविणारे संकल्प पत्र आहे,’ अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष खा
‘किमया’गार शेअर बाजाराबद्दलचे ‘अनुभवाचे बोल’ शेअर बाजार ही अशी गोष्ट आहे, की जी कधी क्षणात श्रीमंती देते, तर कधी तितक्याच वेगाने देशोधडीलाही लावू शकते. शेअर बाजाराच्या या ‘किमये’बद्दलचे काही गमतीशीर आणि काही धडे देणारे स्वानुभव सांगत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language